Tuesday, 17 February 2015

 सत्य 
याला  नेहमीच कपडे घातलेले असतात. 
कोणी डायपर ही घालतात. 
कोणी बुरखा तर कोणी झब्बा । 
त्याला कपड्या विना बागडायचे असते . 
त्याला कपडे नसतील तर 
पाहणारच डोळ्यावर काळा  चष्मा घालतो . 
डोळा काणा  करतो. 
मान फिरवितो ,
पाठ फिरवितो 
त्याला अंधारात ठेवतो . 
त्याची मुस्कट दाबी केली जाते,
तरी हि … 
तो उजेडात येतो 
लख्खपणे चमकू लागतो . 
पाहणाराचे डोळे मात्र दिपतात … 
२०-०५-२०१०

Tuesday, 3 February 2015

श्रीगणेशा...

नमस्कार मित्रांनो !
आज माझ्या ब्लॉगचा श्रीगणेशा करीत आहे.
हा ब्लॉग करण्यात वर्षा आणि अविधा या  दोन छोट्या मैत्रिणींचा हात आहे.
त्यांचा मी खूप आभारी आहे.